पंढरपूर

सहकार क्षेत्रातील विविध समस्या त्वरित सोडावा, अन्यथा राज्यभर अनोदोलन करु

मनसे नेते दिलीपबापू धोत्रे
विविध मागण्यांचे सहकार आयुक्तांना निवेदन…
सचिन झाडे( प्रतिनीधी)
पंढरपूर – सहकार क्षेत्र काही लोकांकडून गिळंकृत करण्याचे काम चालू आहे, सहकार क्षेत्राला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, जनतेच्या बाजूचे निर्णय घ्यावेत अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे चे नेते, सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीपबापू धोत्रे यांनी दिला.पुणे येथे सहकार आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सर्व साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्यासाठी आदेश देण्यात यावा.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा. सर्व सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज द्यावे, असा सर्व सहकारी बँकांना आदेश द्यावा.प्राधिकरणाकडून होणाऱ्या निवडणुकांमध्ये बेरोजगार तसंच इतर सेवा सहकारी संस्थांना ‘ड’ वर्गात समाविष्ट करण्यात यावे आणि डिपॉजिटची रक्कम कमी करण्यात यावी. शासनाच्या विविध विभागांतून बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना कामे देण्यासाठी २००२ पासून शासन निर्णय असतानाही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याची अंमलबजावणी त्वरित व्हावी.मजूर सहकारी संस्थांच्या संदर्भात २००५ पासून नवीन संस्थांची नोंदणी स्थगित केली आहे. ती पुन्हा सुरु करण्यात यावी.पतसंस्थांनी दिलेल्या कर्जासाठी १ वर्ष मुदतवाढ देण्यात यावी.एनपीएचा कालावधी वाढवण्यात यावा.पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या १० लाखांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण देण्यात यावे. गेल्या १० वर्षांत ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूका झाल्या नाहीत त्या लवकरात लवकर घेण्यात याव्यात.यावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, राज्य उपाध्यक्ष सहकार सरचिटणीस अनिशाताई माजगावकर, राज्य उपाध्यक्ष रुपालिताई पाटील, सहकार प्रदेश सरचिटणीस विजय जाधव,मनसे पूणे जिल्हा अध्यक्ष ऍड राजेंद्र गारूडकर,पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद जावंळे,सहकार राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे, सहकार उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, उपाध्यक्ष सुजाता पाठक,सचिव कौस्तुभ लिमये, वल्लभ चितळे, इत्यादी उपस्थित होते,,

Related posts