पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर विद्यापीठाने 19.26% एवढी फी माफी केली त्यांचीअमंलबजावणी करण्यात यावी,यासाठी पंढरपूर शहरातील सर्व महाविद्यालयात अभाविप पंढरपूर शाखेतर्फे निवेदन देण्यात आले
सचिन झाडे
पंढरपूर –
कोरोणाच्या पार्श्वभूमीवरती 2019-20 उन्हाळी सत्रातील प्रथम वर्ष द्वितीय वर्ष व व्यवसायिक अभ्यासक्रमाचे तृतीय वर्ष वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. जर परीक्षा नाही तर परीक्षा शुल्क कशासाठी व या विद्यार्थ्याच्या मागणीला घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पंढरपूर ,सोलापूर विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क माफ करावे .यासाठी कोरोणाच्या काळात जिवाची पर्वा न करता सतत दीड महिना विद्यार्थी विद्यापीठाच्या मानणिय कुलगुरू मॅडम समोर मागणी करत होते व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या मार्फत होणार्या आर्थिक लुटी पासून वाचण्यासाठी तब्बल दोन वेळा विद्यापीठात जोरदार आंदोलन केले.
या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी हिताच्या परीक्षा शुल्क माफी च्या मागणीबाबत सकारात्मक पावले टाकत एक विशेष समिती स्थापन करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांची सत्रातील जमा करून घेतली एकुण परीक्षा शुल्काच्या 19.26 % एवढी परीक्षा फी पुढील सत्रातील म्हणजे 2020-21 च्या पहिल्या सत्रात समायोजित म्हणजेच कपात करणे बाबत परिपत्रक काढले आहे.
तर19.26 % एवढी या सत्रातील परीक्षा शुल्क कपात करून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क घ्यावी व विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याबाबत अभाविप पंढरपूर शाखेतर्फे दिनांक 2-1-2021 रोजी अकलूज शहरातील सर्व महाविद्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी अभाविप जिल्हा सहसंयोजक शिवाणी बेणारे, पंढरपूर तालुका प्रमुख आनंद भुसणर, पंढरपूर शहर मंत्री धनराज भोसले, पंढरपूर शहरसह मंत्री कपील पाटील सुरज भोसले, निखिल कदम, जयदीप माळी, अनंत अंकलकोटे अदी कार्यकर्ते उपस्थित होते.