अंत्रोळी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळीसारख्या छोट्याशा गावाने कोरोनावर १००% मात करीत कोरोना मुक्त गाव बनवले.आज विविध विकासकामांच्या माध्यमातून हे गाव जिल्ह्यात नक्कीच आदर्श बनेल,असा विश्वास माजी मंत्री तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अंत्रोळी येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन कामाचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे,माजी जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अस्मिताताई गायकवाड ,युवासेना जिल्हाप्रमुख मनिष काळजे, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील , नगरसेवक मनोज शेजवळ, हरिभाऊ चौगुले, महिला संघटक शशिकाला चिवनशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोरे, तालुकाप्रमुख योगीराज पाटील, सरपंच कोमल करपे,उपसरपंच सोनाली खरात,शिवशक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष गणेश कर्वे, शिवसेना तालुका उपप्रमुख अशोक हजारे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी थोरात,कर्ण कांबळे,बाबासाहेब बंडगर, अनिल स्वामी,राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सलगरे, माजी सरपंच आनंदा कर्वे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तानाजी सावंत म्हणाले, महिलांच्या हातात कारभार दिल्यानंतर तो कारभार किती स्वच्छ आणि प्रगतीशील असतो. हे या गावाने दाखवून दिले आहे.
ग्रामस्थांनी साथ दिली आणि नेत्यांनी मदत केली. त्यामुळे आता गावचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असेल, असे सरपंच कोमल करपे यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन गावचे सरपंच कु कोमल करपे यांनी मानले.