सचिन झाडे –
पंढरपूर –
वैकुंठ नगरी पंढरपूरात लहान बालकांना जीवनदान देणारे श्री विठ्ठल म्हणून नावाजलेले डॉ. शितल के. शहा यांच्या नवजीवन हॉस्पिटल पंढरपूर व कमल कांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमानाने रविवारी मोफत बाल हृदयरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले,पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर , तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. एकनाथ बोधले,डाॅ.पंकज गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पुणे येथील तज्ञ डॉ.संतोष जोशी, फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डाॅ.वाघमारे, डाॅ.सुनिल पटवा, डॉ. संदेश पडवळ, डॉ. सुखदेव कारंडे, डॉ. विनायक उत्पात,डाॅ. सुधीर आसबे आदींसह हॉस्पिटल येथील कर्मचारी उपस्थित होते…
यावेळी काही दिवसांपूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या पंढरपूर येथील लहान मुलीच्या पाल्याचा सत्कार करण्यात आला.
या बाल रोग निदान उपचार शिबिरामध्ये पुणे येथील तज्ञ डॉक्टरांकडून लहान मुलांची तपासणी करून जन्मतः हृदयाला असलेले छिद्र ओपन हार्ट सर्जरी न करता कॅथलॅब मशीनद्वारे तपासणी करून डिवाइस तंत्राद्वारे कायमचे बंद करण्याची शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत केली जाणार आहे.
शिबिरतील मुलांची तपासणी व शस्त्रक्रिया बाल रोग तज्ञ डाॅ. शितल शहा यांच्यासह पुणे येथील डॉ. संतोष जोशी, डॉ. विकास मस्के आदि डॉक्टरांच्या टीम कडून करण्यात येणार आहे.
यासाठी मुंबई-पुणेनंतर पंढरपूर मध्ये नवजीवन हाॅस्पीटल येथे अत्याधुनिक सेंटर बनविण्यात आले आहे.