राष्ट्रीय समाज पक्षच्या वतीने दि. 8जून रोजी मा.मुख्यमंत्री मा.तहसीलदार मा.जिल्ह्याधिकारी व दुग्ध विकास मंत्री यांना शेतकर्यांच्या दुधाला प्रती लिटर 35 रूपये दर व दुधाला दहा रूपये अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर मिळवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष च्या वतीने निवेदनाद्वारे विनंती मागणी केली होती तरी अद्यापर्यंत महाविकासआघाडी सरकारने शेतकरी दुध उत्पादकांच्या दुधाला भाव वाढवलेला नाही. त्यामुळे दुध उत्पादक अडचणीत सापडला आहे.सध्या कोरोना महामारीमुळे आलेल्या अडचणी आणि जनावरांनसाठी लागणारे पशुखाद्याचे प्रचंड भाव वाढल्यामुळे दुध उत्पादक अडचणीत आहे . सध्या दुधाला 18ते 22 रूपये प्रती लीटर दर मिळत आहे. दुध दर वाढ होण्यासाठी ठाकरे सरकार चे निषेध म्हणून
रासप च्या वतीने करमाळा तहसिल समोर सोमवारी दि.6 जुलै रोजी सकाळी 11:00वाजता आषाढी एकादशी आणि कृषीदिनानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देऊन दुध उत्पादकांना 35 रूपये प्रती लीटर दरवाढीच्या मागणीसाठी शेतकर्यांच्या हितासाठी अखंड देशाचे असलेले दैवत पंढरीचा राजा (विठ्ठल) पांडुरंगाच्या फोटो ला दुग्ध अभिषेक घालून शेतकर्यांचे गांभीर्य नसलेल्या ठाकरे सरकार विरोधी रासप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ए.एल.अक्कीसागर साहेब,माजी मंत्री मा.आमदार महादेवजी जानकर साहेब मा.बाळासाहेब दोडतले मा.अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळ , पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मा माऊली सलगर यांच्या आदेशाने अनोखे अंदोलन छेडणार आहोत. शेतकर्याच्या दुधाला किमान 35 रू.भाव देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना सद्बुध्दी द्यावी असे साकडे घालण्यात येणार आहे.अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुकाअध्यक्ष अंगद देवकते यांनी प्रसिद्ध निवेदनात म्हटले आहे . यावेळी कोरोना संदर्भातील सर्व कायदेशीर नियमांचे पालन करून रासप कार्यकर्ते आणि पदाधिकारी अंदोलन करून शेतकर्याच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधून शेतकरी दुध उत्पादकांना दुध दर वाढ करण्यासाठी भाग पाडू असे देवकते म्हणाले आहे.