आज श्री मकाई कारखान्याच्या रोलर मिलचे पूजन मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय भैय्या बागल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सभासदांचा विश्वास आणि कारखाना प्रशासनाचे प्रयत्न या बळावर यावर्षी आपला मकाई नक्कीच चांगला चालणार आहे.

मकाईने नेहमीच सभासदांचा विश्वास जिंकला आहे, पुढे ही सभासदहित बघूनच कारखाना आपली वाटचाल चालू ठेवणार आहे. या रोलर पूजनास मकाईचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब भाऊ पांढरे, संचालक रामभाऊ हाके, दत्ताभाऊ गायकवाड, एमडी हरिशचंद्र खाटमोडे, सर्व विभागप्रमुख, सभासद, कामगार वर्ग उपस्थित होते…