प्रतिनिधी:-सलमान मुल्ला कळंब – उस्मानाबाद जिल्ह्यात मा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दिनांक 4/7/2020 रोजी जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला होता.मात्र जनता कर्फ्यु असताना देखील कळंब तालुक्यातील चौसाळा येथील हॉटेल सार्थक सुरू होते. याची माहिती प्रशासनाला सूत्रांकडून मिळताच कळंब येथील नायब तहसीलदार असलम जमादार व उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील यांनी छापा मारून दारू सोबत ६ मोटर सायकल असा मुद्देमाल जप्त केले व १८ जणांना ताब्यात घेत जबरदस्त कामगिरी बजावली.

या कार्यवाहीमुळे अवैध धंदे वाल्यांना चांगलीच धडकी भरली आहे तर पोलीस प्रशासन व महसूल विभागाने असाच समन्वय साधून योग्यरीत्या कार्यवाह्या केल्या तर अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही..
सदरील कार्यवाही वेळी पोलीस कॉन्स्टेबल सय्यद,पो.ना.काझी मंडळ अधिकारी पाचभाई, कोतवाल पतंगे,वाहन चालक सुरवसे यांनी मोलाचे सहकार्य केले.