29.7 C
Solapur
September 29, 2023
महाराष्ट्र

उपविभागीय कृषी अधिकारी यांचे मालसई येथील शेतकर्यांना कृषी विषयक मौलिक मार्गदर्शन

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त संपूर्ण राज्यात सर्वत्र १ ते ७ जुलै २०२० कृषि संजीवनी सप्ताह साजरा होत असताना याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याच्या मौजे मालसई या ठिकाणी आज दि ०२/०७/२०२९ रोजी शेतकर्यांना कृषि विभागाच्या विविध योजनां बाबत उपविभागीय कृषि अधिकारी माणगाव श्री.मिलिंद जाधव यांनी शेतकर्यांना कृषि तंत्रज्ञान, एकात्मिक शेती पद्धतीने, बीज प्रक्रिया, माती परिक्षण, लागवड, कि डरोग नियंत्रण, खतांचा वापर इत्यादी विषयांवर आणि कृषि विषयक सर्व योजनांची सविस्तर अशी मौलिक माहिती दिली.


या नंतर कृषि पर्यवेक्षक श्री.डी.बी.साळे यांनी मौलिक माहीती दिली. रोहा तालुक्यातील सदर मालसई गावातील शेतकरी श्री.पांडुरंग उमाजी चाळके यांचे शेतावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत आंबा लागवड करण्यात आले,यावेळी कृषि विभागाचे तालुका कृषि अधिकारी रोहा श्री.कुमार जाधव,मंडळ कृषि अधिकारी रोहा श्री .अमोल सुतार ,कृषि पर्यवेक्षक श्री वासुदेव पाटील,कृषि सहाय्यक कु.पल्लवी उबाळे उपस्थित होते.

Related posts