30.7 C
Solapur
September 28, 2023
तुळजापूर

तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार कैलासदादा पाटील यांचा सत्कार.

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी.

राज्य पंचायतराज समिती सदस्य (PRC) तसेच जिल्हा नियोजन समिती उस्मानाबाद कार्यकारी समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास(दादा)पाटील यांची निवड झाल्याबद्दल तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने यथोच्छित सत्कार करण्यात आला.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास(दादा)पाटील यांना लागोपाठ 2 संध्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिल्यामुळे धाराशिव शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सत्कार समारंभावेळी यांनी बोलताना सांगितले की, येणाऱ्या काळात तुळजापूर तालुक्यात “माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र” या अभियानांतर्गत “गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक” तसेच तालुकाभर शिवसेना सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार आहे असे सांगितले. यानंतर त्यांनी आपण आलेल्या जबाबदारी चे सोन करत विकासकामे अतिशय गतिमान करू असे आश्वासन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिले. तसेच ही विकासकामे करत असताना आपण सर्वांनी मला सहकार्य करून नागरिकांच्या योग्य गरजांची माहिती मला वेळोवेळी द्यावी व सर्व जनतेची कामे होता होईल तेवढं लवकरात लवकर पूर्ण करावीत असे आवाहन यावेळी त्यांनी शिवसैनिकांना केले.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख रोहित नागनाथराव चव्हाण, शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, सिदफळ सोशल मिडीया विभाग प्रमुख सिद्राम कारभारी, बालाजी पांचाळ, विनोद दुपारगुडे, कुमार साखरे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related posts