प्रतीक भोसले,
सलगरा(दि) प्रतिनिधी.
किलज-तुळजापूर तालुक्यातील किलज येथील यावर्षी पासून सुरू करण्यात आलेल्या किलज भूषण फाऊंडेशन तर्फे “किलज भूषण पुरस्कार” सुरू करण्यात आला असून या पुरस्काराचा मानकरी हा किलजमधील आंतराष्ट्रीय ऑलम्पिड गणिती स्पर्धा मध्ये सुवर्णपदक मिळवलेला पार्थ उमेश भोईटे हा ठरला आहे.
स्वातंत्र्यसेनानी.कै. गुराप्पा बाबाराव कोनाळे यांच्या स्मरणार्थ हा किलज भूषण पुरस्कार देण्याचा उपक्रम किलज भूषण फाऊंडेशन यांनी केला आहे. दि.२५ डिसेंबर रोजी हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराचा मानकरी हा पार्थ उमेश भोईटे हा ठरला असून त्याचा सत्कार करण्यात आला. तसेच इ.१० वी मध्ये झालेल्या बोर्ड परीक्षेत श्रद्धा विजयकुमार सगर हिने १०० पैकी १०० गुण मिळवून यश संपादित केले होते.त्या ठिकाणी तिच्या अनुउपस्थितीमध्ये तिचे वडील विजयकुमार सगर यांनी तिचा सन्मान स्वीकारला.
या कार्यक्रमासाठी किलज भूषण फाऊंडेशन चे अध्यक्ष. नागनाथ कुठार, उपाध्यक्ष. पंडित जळकोटे, सचिव बनसिद्धाप्पा कोनाळे , शिवराज मरडे, बाबुराव भोईटे, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, विठल मरडे, ज्ञानेश्वर कुठार, संजय भोईटे, मल्लिकार्जुन येलुरे, जगन्नाथ शिंदे,प्रवीण कुठार,सह आदी मान्यवर उपस्थित होते.