तुळजापूर

महाराष्ट्र उर्जा विकास आभिकरण (महाउर्जा ) अंतर्गत पारेषण विरहीत सौर उर्जा पंपाद्वारे लघुजल व नळ पाणीपुरवठा कार्यक्रम संपन्न.

पुरूषोत्तम विष्णु बेले,
तुळजापूर / प्रतिनिधी.

ही योजना २०१८ मध्ये मंजूर झाली होती . अंदाजपत्रकीय किंमत रू ३ .४० लक्ष ( तीन लक्ष चाळीस हजार माञ ) आहे.
या कामासानी राज्यस्तरावरून निविदा काढण्यात आली होती व मे. सोयो सोलार सिस्टीम्स , जळगाव या एजन्सीने सदर काम घेतले होते .केवळ एक लोखंडी सांगाडा व योजनेचा बोर्ड एवढेच काम तीन वर्षापूर्वी झाले होते व सोलार पॅनल्स , विद्युत पंप इ. महत्वाच्या बाबी राहिल्या होत्या .सदर अपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी ग्रा.पं . खुदावाडी व स्वतः सरपंच श्री . शरद नरवडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु सदर जळगाव स्थित मे. सोयो सोलार सिस्टीम्स , जळगाव ही कंपनी सहकार्य करीत नव्हती .कंपनीचे अधिकारी फोन रीसीव करीत नव्हते .

आज दि .o४ / ११ / २०२० रोजी सदर कंपनीची गाडी किरकोळ दुरुस्तीसाठी खुदावाडी येथे आली असता सदर कामाची सद्यस्थिती ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष पाणीपुरवठा विहीरीवर कर्मचाऱ्यासह जाऊन कंपनी प्रतिनिधीला दाखविली .आमच्याकडे किरकोळ दुरुस्तीचे काम आहे . सोलार पॅनेल, विद्यूतपंप आमच्याकडे नाही अशी उडवाउडवीची उत्तरे कंपनी प्रतिनिधी यांनी दिल्यानंतर ग्रामसेवक श्री. मोकाशे एम्.व्ही. यांनी सदर गाडी रोखून ठेवली व सरपंच श्री . शरद नरवडे यांना बोलावून घेतले .सरपंच श्री. नरवडे यांनी सुध्दा आक्रमक भूमिका घेऊन महाउर्जा अधिकारी व मे.सोयो सोलार सिस्टीम्स , जळगाव यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर चर्चा केली . काम पूर्ण झाल्याशिवाय सदर गाडी सोडणार नाही तसेच कंपनी विरोधात पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंद करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली . शेवटी कंपनी अधिकाऱ्यांनी आजच्या आज काम पूर्ण करू गुन्हे दाखल करू नका अशी विनंती केली . सायं. ठीक ०५ वा. काम पूर्ण झाले व तीन वर्षापासून कंपनीने अपूर्ण ठेवलेले काम आज एका दिवसात पूर्ण करून मिळाले .

सदर कंपनीच्या कर्मचाऱ्यांची आज ग्रा.पं . खुदावाडी येथे निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून उद्या योजनेचे ट्रायल घेण्यात येईल व यशस्वी चाचणीनंतर सदर कर्मचाऱ्याचा सत्कार करून त्यांना पाठवण्यात येईल असे सरपंच श्री . शरद नरवडे यांनी जाहिर केले .
सदर योजनेचे उद्घाटन प्रसंगी विविध सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन श्री . तुकाराम बोंगरगे , सरपंच श्री. शरद नरवडे , श्री. महादेव सालगे , नरवडे श्रीधर, ग्रामसेवक श्री.महेश मोकाशे , श्री . रमेश पाटील ,ग्रा पं. व लिपीक भास्कर व्हलदूरे, श्री.पांडूरंग व्हलदूरे, श्री. दगडू गायकवाड आदि जण उपस्थित होते.

Related posts