27.5 C
Solapur
September 27, 2023
उस्मानाबाद  तुळजापूर

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुका शिवसेनेची बुधवारी महत्वाची बैठक.

साईनाथ जगन्नाथ गवळी
उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हा
प्रतिनिधी.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या सुचनेनुसार तुळजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक बोलवण्यात आले असून तालुक्यातील शिवसैनिकांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी आणि शहरप्रमुख सुधीर कदम यांनी केले आहे.

तुळजापूर तालुक्यातील लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात तुळजापूर तालुका शिवसेनेच्या वतीने ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छुणारे शिवसैनिक व पक्षाची निवडणूक लढण्यासंदर्भात रणनिती आखण्यासाठीचा आराखडा, पक्षाची ध्येय धोरण समजून घेण्यासाठी निवडणूक लढवू इच्छुणारे उमेदवार व शिवसैनिक, गणप्रमुख, विभागप्रमुख, शिवसेना तालुका पदाधिकारी यांनी दि. २३ डिसेंबर २०२० रोजी ठिक दुपारी 2 वाजता तुळजापूर शिवसेना शहर मध्यवर्ती कार्यालय येथे उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी व शहरप्रमुख सुधीर कदम यांनी केले आहे.

Related posts