मी वेचलेली फुले
किती सुगंधित होती
त्याच फुलांच्या
सुगंधा वर माझी
नजर होती।
मी वेचलेल्या फुलांची वेली
अनुभवाने भरलेली होती
जीवनातील अमूल्य गोड
संस्काकाराची शिदोरी त्या
वेलीवर होती
वेली फुलांच्या रूपाने
संस्कार उधळीत होती
सत्य, शील,प्रेम,विनम्रता
शब्दांचा गोडवा सांगत होती
मी माझ्या जीवनात
हीच फुले उचलली
कोमल कळ्या सहित
नवीन पिढीला रुजवली
मी वेचलेल्या या नाजुक
कळ्या फुलांचा सुगंध
जीवनात आजही शांत
दरवळत राहिला।
मी वेचलेली फुले बोलत राहिली तरळत राहिली. . . !
कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद