27.5 C
Solapur
September 27, 2023
कविता 

परोपकारी नदी

नदी सागरास मिळते
परोपकार किती करते
गाव गाव शहर शहर पिण्यासाठी पाणी देते
पशुपक्षी प्राणी मानवास
ती तृप्त करते

लहान-मोठ्या वनस्पतीने सुजलाम-सुफलाम करते अन्नधान्य सर्वांना पुरवते निस्वार्थी त्यागी असते
लहानथोर सर्व जातिधर्मांच्या मानवास एकसमान पाणी देते परोपकार करत करत नदी सागरास मिळते
नदी अमृततुल्य पवित्र जल आपल्याला देते
पर्वत डोंगर दऱ्या खोऱ्या
खड्डे दुःख झेलत झेलत परोपकार करत करत
सागरास जाऊन मिळते
नदी परोपकारी असते

————————————–
कवि
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts