30.7 C
Solapur
September 28, 2023
Blog

हे आपल्याला शोभते का- – – -?

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर
……………………..

या फोटोमध्ये वरील फोटोत आपल्याला एक शेतकरी भाजी विकत असताना दिसत आहे शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांचे कष्ट रात्रंदिवस मातीत घाम गाळून मातीशी एकरूप होऊन पिकवलेला भाजीपाला विकताना त्याच्या चेहऱ्यावरील आनंद उत्साह वाढलेला असतो तोच स्वाभिमानाने भाजी विकायला रस्त्यावर चौकात बाजारात बसतो अंगावरील कपड्याचे ऊन वारा पाऊस याचे त्याला भान राहत नाही शेतातून डोक्यावर ओझे वाहत वाहत गाव व बाजार गाठतो मित्रांनो या फोटोतील चेहरा निरखून पहा नाइलाजाने पाच रुपयाला दोन मेथीच्या पेंड्या ्याला द्याव्या लागतात चेहर्‍यावरील केविलवाणे भाव आनंद दुःख यातना कौतुक व आश्चर्य असे सगळ्या मिश्रणाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसू लागतात.

रात्रंदिवस काबाडकष्ट उपसणारे हात आपल्यापुढे जोडतात आपण मात्र आपल्या साहेबी रुबाबात दहाला तीन द्या दहा लाचार पेंड्या द्या म्हणून ओरडत बसतो खरंच मनाला विचारा आपल्याला हे पटते का? आपल्याला हे शोभते का? हॉटेल चेभलेमोठे बिल असेल कपडा सोने हॉस्पिटल मेडिकल चे बिल वाटेल तेवढे डोळे झाकून देतो पण एका गरीब कष्टकर्‍या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यासाठी बिना कामाची चिकाटी करून आपण काय मिळवतो? कष्टकऱ्यांची त्याच्या श्रमाचा आवमान करतो त्याच्या पाठीमागे त्याचे कुटुंब असते लेकरं बाळं असतात उपाशीपोटी त्याची वाट बघत असतात याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे मला वाटते अशा गरीबांकडे मन मोकळे व हात मोकळे सोडून खरेदी करावी व त्यांना सहकार्य करावे हीच आपली नैतिकता व माणुसकी आहे.

Related posts