30.7 C
Solapur
September 28, 2023
कविता 

महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस – महाराष्ट्राचा वाघ थंडावला….!

कर्तृत्त्व नि वक्तृत्त्वाची
जणू तळपती तलवार,
या तेजस्वी नेतृत्त्वाचा
मराठी मनास आधार…

हिंदू हृदयसम्राट किर्ती
महाराष्ट्रभर गाजली,
शिवसेनेची ही गुढी
बाळासाहेबांनी उभारली…

मराठी माणसांचा ज्याने
केला होता अनादर,
साहेबांच्या व्यंगचित्राने
आणले हो वठणीवर…

मार्मिक साप्ताहिकाने
हक्काची लढाई करुन,
भूमिपुत्राच्या न्यायाची
दिली आरोळी ठोकून…

शिवसैनिकांना हृदय देणारा
अमर ठरला सम्राट,
लाखोंची मने जिंकून
झाला हिंदू हृदयसम्राट…

शिवरायांचा आदर्श ठेवून
हाती घेतले भगव्याला,
महाराष्ट्राच्या हितासाठी
जपले हो हिंदूत्त्वाला…

शब्दालाही धार होती
होता कणखर बाणा,
झाला नाही,होणार नाही
असा हा तुफानी राणा…

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्व. बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण आदरांजली…!💐💐

◆कवी:-
सौ. ज्ञानेश्वरी शिंदे-नरवडे (मॅडम)
सहशिक्षिका-जि.प.प्रा.शाळा, तामलवाडी.
जिल्हाध्यक्ष-दिव्यांग कर्मचारी महिला आघाडी

Related posts