कविता 

मांगल्याचे प्रतिक- – – रांगोळी

सण असो की वार असो
दारात सजते रांगोळी
मनामनात फुलते रांगोळी
सप्तरंग गातील रांगोळी

मन प्रसन्न करते
आनंदीआनंद देते
सर्वांच्या परिवारी
असो वाढदिवस,वा कार्यक्रम
अभिष्ट चिंतन दिवाळी दसरा महालक्ष्मीचा सण

रांगोळी विना सुना सुना
लाल पिवळी हिरवे
केशरी पांढरी नारंगी
रांगोळीच्या चित्रातून साजे

इतिहास कला शिल्प संस्कृती सर्वांच्या स्वागतासाठी
सदा तयार रांगोळी
मांगल्याचे प्रतीक
उज्वल ते चे प्रतीक
सकारात्मक तेचे प्रतीक
एकतेचे प्रतीक ,प्रेमाचे,
जीवनातील दुःखाला विसरून आनंदाला उधान आणते
रांगोळी रांगोळीच्या चित्रातून साजे दीपावलीचा सण

रांगोळीच्या वरती साजे
मनमोहक सुंदर मोर
रांगोळीतून सजल्या
करंज्या चकल्या लाडू
शंकरपाळे

श्री महालक्ष्मी धनलक्ष्मी सुंदर साजे।🙏🏻🙏🏻

कवि
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद।

Related posts