अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंगकुडलसंगम येथील श्री संगमेश्वर मंदिर पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आल्याने आणि येथील श्री संगमेश्वर मंदिराचे वार देखील सोमवार असल्याने सोमवारी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागावर्ती असलेल्या या प्रसिद्ध श्री संगमेश्वर मंदिर हे कोरोनो महामारीच्या काळात आठ महिन्यापासुन बंद असल्याने आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुला करून दिले आहे. त्यामुळे भाविकांचा आनंद गगनाला भिडले आहे.
भीमा आणि सीना नदीच्या पवित्र संगमावर वसलेल्या श्री संगमेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील असल्याने या ठिकाणी दर सोमवारी आणि अमावास्याला भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे कोरोनो काळात आठ महिन्यात मंदिर परिसर शुकशुकाट दिसत होते.आता आघाडी सरकारने भाविकांच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतल्याने भावीक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आणि देवस्थान कमिटी ला देखील मंद्रुप पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांनी कोरोनोच्या बाबतीत योग्य त्या बाबींचा सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितलेले आहे.
कोरोनो महामारीच्या काळात तब्बल आठ महिन्यानंतर आज पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी खुला करून दिल्याने आम्ही मनस्वी सरकारचे मी मनापासून आभार मानतो.
– हणमंत बगले
भाविक-हत्तरसंगकुडलसंगम