हे उगवत्या सूर्या तुला साक्षी ठेवून नवीन वर्षाची नवीन सुरुवात करीत आहोत आम्ही तुझ्याच उगवण्याने सृष्टी सुरू होते कळ्या फुलतात रवी किरणाने फुले सुगंध उधळीत हिरव्यागर्द हिरवळीवर दवबिंदुं चे सुवर्ण स्नान
तुझ्याच मुळे सृष्टीला
मिळते दृष्टी
हे उगवत्या सूर्या
वेली फुले पाखरे
भुलतात तुझ्या रूपाला
मधुर वाणीने करिती किलबिल ,किलबिल,
मधमाशांचे हे गुंजन
हे उगवत्या सूर्या तुझ्यातील कडक् शिस्त नियमितता प्रखरता, समानता लाभू दे पशुपक्षी प्राण्यावर
तुझी अशीच माया राहू दे
हे उगवत्या सूर्या तुझे कोमल सुंदर तेज लाभू दे आम्हा जीवनातील आमच्या जळू दे अज्ञाना, अहंकाराचा अंधकार आणि उजळू दे ज्ञानाचा दिप
, त्यागाचा प्रकाश
हे उगवत्या सुर्या…!
कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर