कविता 

आधार मायेचा – -आजी आजोबांचा

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर जिल्हा उस्मानाबद.

=====================================================================================

पूर्वीच्या एकत्र कुटुंबात
प्रेमळ आजी, आजोबा
असायचे,घराला घरपन
आनायचे।

खुप आधार असायचा
बालपणी, कळलेच नाही
की, दोन- दोन आजी आजोबा
कसे असायचे?

एक गावी गेले की,दूसरे
यायचे,गालावरुन, डोक्यावरुन
मायेचा हात फिरवत
विचारपुस करायचे।

गोड, धोड़, आनलेले
खायला द्यायचे, झाली
काही चूक, तर मोठा आधार
द्यायचे,आपल्या साठी घरभर भांडायचे।

सगळे आपलेच कौतुक सांगायचे
किती हुशार बाळ आहे!
पुन्हा करणार नाही म्हणायचे
मायेचा मोठा आधार द्यायचे।

सायंकाळी देवाजवळ
दिवाबत्ती व्हायची ,
शुभम करोती, गणपति स्तोत्र
मंगलमय संस्काराचे मोती उधळन व्हायची ।

कळले नाही त्यावेळी,
पण आजी आजोबाच्या मायेतुन नवीन जीवनाची सुरुवात व्हायची !खुप मोठा मायेचा
आधार असायचा,जीवनात
आंनदी आंनद असायचा।
आंनदी आंनद असायचा।

Related posts