24.2 C
Solapur
September 26, 2023
दक्षिण सोलापूर

नांदणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवानंद बंडे तर उपसरपंचपदी बिरप्पा वरवटे यांची निवड ; १० वर्षानंतर ग्रामपंचायत निवडणूकित सत्तांतर.

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर विशेष प्रतिनिधि

दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी ग्रामपंचायती मध्ये तब्बल १० वर्षांनंतर सत्तांतर झाले असून माजी सरपंच नागण्णा बनसोडे,पांडुरंग बंडे,पांडुरंग टेळे,शिवानंद धानगोंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकशक्ती विकास पॅनलचे ६ व विरोधी गटाचे ३ सदस्य निवडून आले आहे.

दिनांक २३/०२/२०२१ रोजीच्या झालेल्या सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीत सरपंचपदी शिवानंद बंडे उपसरपंचपदी बिरप्पा वरवटे उपसरपंचपदी बिनविरोध निवडून आले आहे त्यामुळे लोकशक्ती पॅनलचे सदस्य लक्ष्मी मच्छिंद्र बंडे, लालसाब मीराबाई शेख, गंगाबाई माळप्पा डोंमनाळे, इंदुबाई रेवणसिद्ध सुरवसे असे एकूणच ६ सदस्य निवडुन आले आहेत.त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच व उपसरपंच व सदस्यांचा सत्कार ग्रामस्थांनी करण्यात आले.

यावेळी नागण्णा बनसोडे, शिवानंद तळे,भारत खरात,नागनाथ धानगोंडे सावकार व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते राहुल काळे भीमाशंकर बनसोडे हणमंत डोमनाळे आदी उपस्थित होते.

Related posts