26.8 C
Solapur
February 29, 2024
दक्षिण सोलापूर

नांदणी ते निशाणदार वस्ती औराद रस्त्याच्या कामाला चौकशीचे आदेश

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी/दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी ते औराद येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष अनमोल केवटे यांनी तक्रार अर्ज करीत पाठपुरावा केल्याने सदरच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सदरचा रस्ता हा निकृष्ट झाल्याने बहुजन हक्क अभियान जिल्हा कार्याध्यक्ष अनमोल केवटे यांनी सदरील ठेकेदारावर कारवाई होण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता.
या अर्जाचा दखल राज्य गुणवत्ता समन्वयक,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे मुख्य अभियंता श्री.रं.कातकडे यांनी घेतला आहे. सदरील कामाच्या दर्जा तपासणी राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्या मार्फत करण्यात यावी तसेच चौकशीचे अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.
तसेच सदरचे काम करणारे मे.श्री.लक्ष्मी एन्टरप्रायझेस कंपनी लि.सोलापूर यांचे सर्व देयके थांबवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीसुध्दा दि.१२/१०/२०२० केल्याचे केवटे यांनी सांगितले.

Related posts