कविता 

बिन पाखरांची शाळा- – – – –

🦜🦜🦜🦜🦜🦜-
🕊️🕊️🕊️🕊️🕊️

कोरोणा महामारी आली
फिरून लॉक डाउणची
पाळी आली!
शाळेत दररोज चिव चिव
करणारी चिमण्या पाखरे
भुर्रकन उडून गेली!
नाही खेळ, नाही आरडाओरड
नाही बोलणें, हसणे
ना घंटिचा आवाज,ना
डब्याचा खड़खड़ाट

नळावर पण्यासाठी ना
खटपट
ना मैदानावर गलबला
मैदान सारे रीते रीते
ना मॅच जिंकलेला जल्लोष!
ना कुस्ती,ना मस्ती!
सारे वर्ग शांत,शांत
वृक्ष,वेली, पाने,फुले
निराश!
बिन पाखरांची शाळा
किती उदास उदास!
किती उदास उदास!!

कवि
देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद।

Related posts