अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी/दक्षिण सोलापूर
भारतीय फिल्म इंडस्ट्रीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त बरूर येथे साजरा करण्यात आला. बरुर तालुका दक्षिण सोलापूर येथील रहिवासी श्री.सिद्धाराम ख्याडे उर्फ डॉन हे अमिताभ बच्चनचे फार मोठे फँन आहेत. गेल्या २० वर्षापासून ते बिग बी चे वाढदिवस साजरा करीत आहेत.
या दिवशी ते शालेय मुलांना पेन,वही,पेन्सिल, रबर या प्रकारच्या वस्तू फ्री गिफ्ट म्हणून देत असतात. त्यांच्या या उपक्रमाबद्दल समाजातील सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटातील अभियानामुळे प्रेरित होऊन स्वतःचे नाव घोषित केले आहे.गावातील एका चौकाचे नाव देखील डॉन चौक ठेवले आहे.संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुका त्यांना डॉन या नावाने ओळखतात.महानायक अमिताभ बच्चन यांना उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना बरूरच्या या युवकांकडून करण्यात आला आहे.