साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
माहे-ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक पुल वाहुन गेले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील वाहून गेलेले पुले दुरुस्ती करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख-पाटील साहेब यांच्या कडे माजी मंत्री आ.प्रा. तानाजीराव सावंत, आ.ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील तसेच धाराशिवचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी मागणी केलेळी होती. “मुख्यमंत्री ग्राम सडक योजने” अंतर्गत 2020-21 या वर्षी जिल्ह्यातील एकुण 13 पुलांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी मागणी धाराशिव (उस्मानाबाद) चे खा. ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
यामध्ये मंजुरी मिळालेल्या कामांची सविस्तरपणे माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील रा.म.मा.52 उस्मानाबाद ते उपळा (मा) रस्ता कि.मी.0/00 ते 5/00 सा.क्र.4/500 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 14 लाख, सारोळा ते शिंदेवाडी रस्ता कि.मी.0/00 ते 5/470 सा.क्र.0/400 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 1 कोटी 49 लाख, तुळजापूर तालुक्यातील रा.मा.9 नळदुर्ग-चिकुंन्द्रा- किलज रस्ता कि.मी.0/00 ते 14/900 सा.क्र.11/656 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 36 लाख, रा.म.मा 65 ते मुळेवाडी शेटे तांडा रस्ता कि.मी.0/00 ते 2/700 सा.क्र.1/200 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 1 कोटी 76 लाख, कळंब तालुक्यातील प्रजिमा-19 ते निपाणी-पाडोळी रस्ता कि.मी.0/00 ते 10/600 सा.क्र.10/100 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 3 कोटी 28 लाख, भोसा ते गौर माळी वस्ती सा.क्र.0/510 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 91 लाख, कोथळा ते गायरान वस्ती सा.क्र.0/710 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 59 लाख, रा.मा.236 हिंगणगाव-आवाड शिरपुरा- सौन्दना(आ) रस्ता कि.मी.0/00 ते 14/00 सा.क्र.9/50 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 3 कोटी 91 लाख, भूम तालुक्यातील तित्रज ते मुरूम कर वस्ती-साबळे वस्ती सा.क्र.0/800 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 46 लाख,परंडा तालुक्यातील प्रतिमा-01 ते श्रीधरवाडी-मस्केवस्ती रस्ता कि.मी.0/00 ते 2/200 (L-71) ता.परंडा सा.क्र.1/00 वर बुडीत पुलाचे बांधकाम करणे. 2कोटी 8 लाख, रा.मा.210 ते इंनगोंदा वाटेफळ- लोणारवाडी-तांदुळवाडी-कोकरवाडी जिल्हा सरहद्द ता.परंडा सा.क्र.3/500 वर बुडित पूलाचे बांधकाम करणे. 5 कोटी 43 लाख, लोहारा तालुक्यातील प्रतिमा -41 ते कमालपूर सा.क्र.2/200 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 4 कोटी 28 लाख, उमरगा तालुक्यातील टी-09 ते कोथळी ता.उमरगा सा.क्र.0/800 वर उच्च स्तरीय पुलाचे बांधकाम करणे. 2 कोटी 34 लाख अशा एकूण 13 पुलांच्या कामांसाठी “मुख्यमंत्री ग्राम सडक योजने” अंतर्गत 37 कोटी 15 लाख निधी मंजूर झाले असून लवकरच कामे सुरू होणार आहेत.
त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व अर्थमंत्री मा.ना.अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख-पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार यावेळी संपूर्ण जिल्हावासीयांच्या वतीने खा. ओमराजे निंबाळकर यांनी मानले.