उस्मानाबाद 

धाराशिव तालुक्यात शिवसेना नंबर 1 च. -तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे आता चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यात शिवसेनेला जनतेने स्पष्ट बहुमत म्हणजेच पसंती दिल्याचे धाराशिवचे शिवसेना तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी यांनी सांगितले.

महाराष्ट्राराचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, धाराशिवचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर तसेच कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिव तालुक्यातील 65 गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीत धाराशिव तालुक्यातील मायबाप जनतेने शिवसेनेला प्रचंड मतरुपी आशीर्वाद दिले असल्याचे तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी यांनी सांगितले.

ग्रामपंचायत सरपंच पदाच्या नुकत्याच निवडी झाल्या आहेत. त्यामध्ये शिवसेना नंबर एकच राहिले आहे. 65 पैकी 32 जागेवर शिवसेना प्रणित सरपंच निवड झाली असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी यांनी सांगितले. नवनिर्वाचित सर्व शिवसेना लोकप्रतिनिधींचे सर्वांचे अभिनंदन यावेळी करण्यात आला व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर धाराशिव जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास पाटील धाराशिव तालुका प्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी शुभेच्छा दिल्या.

तालुक्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत व जनादेश दिल्याने समस्त मतदार बांधवांचे व जनतेचे जाहीर आभार यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मा. सतिशकुमार सोमाणी यांनी मानले. तसेच जनतेने ठेवलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत, खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदैव जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत असे यावेळी धाराशिवचे शिवसेना तालुकाप्रमुख मा. श्री. सतिशकुमार सोमाणी यांनी यावेळी सांगितले.

Related posts