उस्मानाबाद 

नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रकल्पांच्या विकासकामांचा आढावा बैठक संपन्न.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद(धाराशिव) येथे राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री, शिवसेना नेते ना.मा.एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध नगर परिषदा व नगर पंचायत क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या विकासकामांचा आढावा बैठक संपन्न झाली.

उस्मानाबाद शहरासाठी महत्वपूर्ण असलेल्या भुयारी गटार योजनेला अंतिम मंजुरी द्यावी व शहरातील भोगावती नदी चे पुनर्जीवन व सुशोभीकरण करण्यात यावे. तसेच तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा त्यासाठी नगर विकास विभागाने परवानगी द्यावी. सर्व नगरपालिकेला लोकसंख्येच्या प्रमाणे निधी द्यावा अशा विविध मागण्या मंत्री महोदय यांच्या कडे यावेळी करण्यात आल्या.

यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, खा. ओमराजे निंबाळकर जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष नंदूभैय्या राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.उपाध्यक्ष धनंजय सावंत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड, सर्व नगरपालिकेचे सन्मानित नगराध्यक्ष, मुख्य अधिकारी तसेच सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related posts