जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
कळंब:-कोरोना काळात लाखो वीज ग्राहकांना वाढीव बील आली लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. वाढीव वीज बील सुधारणा करून सामान्य जनतेला वीज सवलत देण्याची घोषणा राज्य सरकारने करूनही तिघाडी सरकारने सवलत देण्यापासून घुमजाव केले सामान्य जनतेची फसवणूक केली.
लबाड सरकारच्या निषेधार्थ आज संघर्षयोद्धा भारतीय जनता पार्टी कार्यालय ढोकी रोड कळंब येथे वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,रामहारी शिंदे,अरुण चौधरी,अनिल टेकाळे,शिवाजी बारते,प्रशांत लोमटे,संतोष कसपटे,माणिक बोदर,भगवान ओव्हाळ,सतपाल बनसोडे,संजय जाधवर,सुशील शेळके,भूषण करंजकर,किरण पाटील,आबा गायकवाड,पंडित देशमुख,सुदर्शन कोळपे,वैभव देशमुख,आशोक क्षीरसागर,धम्मा वाघमारे,आबा रणदिवे आदी उपस्थित होते.