24.2 C
Solapur
September 26, 2023
उस्मानाबाद  कळंब महाराष्ट्र

शेतकरी विरोधी कृषी विधेयक रद्द करा; संभाजी ब्रिगेडची मागणी.

उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सलमान मुल्ला

शेतकरी विरोधी कृषी विधेयक कायदे रद्द करावे व दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरील दडपशाही थांबवावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने कळंब उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,शेतीमाल विक्री कायदा 2020 बऱ्याच कालावधीपासुन शेतकरी त्यांच्या मालाला आधारभुत किंमत मिळावी म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करा म्हणत असताना शेतीमाल विक्री कायदा लागु करून कृषी उत्पन्न बाजार समीतीचे खच्चीकरण करूण भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याचा घाट घातला आहे त्यामुळे तो थांबविण्यात यावा व शेतकरी विरोधी शेतीमाल विक्री कायदा2020, कंञाटी शेती कायदा2020,अत्यावश्यक वस्तु कायदा हे कायदे रद्द करावे,स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात,दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील दडपशाही तात्काळ थांबवावी,दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व आगामी काळात प्रस्तावित असलेले शेतकरी विजबिल विधेयक पुढे रेटणे थांबवावे अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

उपविभागीय अधिकारी डॉ.अहील्या गाठाळ यांना दिलेल्या या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अॉड.तानाजी चौधरी,माजी जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड,जिल्हा सचिव आशिष पाटील,संभाजी ब्रिगेड कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख दत्ता कवडे,सुग्रीव खापे,संभाजी शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण,जिल्हा संघटक विकास गडकर,तालुकाध्यक्ष बालाजी नाईकनवरे,दिनेश चोंदे,इम्रान मिर्झा,प्रशांत गायकवाड,अक्षय मुळीक,शिवदास पवार,गुलाब शेख,स्वप्नील बरकसे मनोज पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related posts