नवी दिल्ली :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीत कार्यकारी अध्यक्ष हे नवीन पद तयार करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या दोघांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती स्वत: पवार यांनी दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आणखी बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.
previous post
next post