झाली दिवाळी दिवाळी
पाच दिवसाचा सण
भुरकन वार्यावानी
ओसरला हा आनंद
झाली दिवाळी दिवाळी
लेक सासरी निघाली
दिवाळीची आठवण
डोळे भरून साठवली
भावा बहिणीची भेट
आनंदीआनंद दाटला
बहिण ओवाळी भावाला भाऊबीजेच्या सणाला
,सुगंधि तेल उटनयाची
प्रात: काळी अंघोळी
अंगणात शोभे सुंदर रांगोळी
पणत्यानी उजळले होते घर
आकाश दिव्यांनी लखलख सायंकाळ लाडू करंजी चा
रोज सकाळी फराळ
अशी आनंदी दिवाळी
लेकी डोळ्या आनी पाणी
अश्रु आवरत आवरत
लेक सासरी निघाली- – – –
लेक सासरी निघाली- – –
कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर.