यशाच्या पायऱ्या असतात
खुप अवघड,वर चढन्यासाठी
करावी लागते तड़जोड
यशाच्या पायऱ्या असतात
खुप ऊंच,चढ़ उतार
वळणावळणाची आडवाट
चालताना तोल सावरावा लागतो
जीवनाचा कसरत करावी लागते
परीश्रमाचीपराकाष्ठा,
प्रामाणीकपणाचा कस,
जिद्द,मेहनत व चिकाटी
हा खरा यशाचे शिखर
गाठण्याचा मंत्र!
जीवनाच्या स्पर्धेत आपण
भाग घेतला आहे त्यात
वेगवेगळी भूमिका बजावत
आहोत,नवयुवकानो यशाचे
शिखर सर करा
स्वावलंबी,स्वाभिमानी, गुणवान
बना गाठल्यावर शिखर आपली
जबाबदारी विसरु नका!
========================================================================================
कवि:-
श्री देविदास पांचाळ सर
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद।