महाराष्ट्र

का आहे तुजपाशी ?

का आहे तुजपाशी
ज्ञानाचे भांडार
मग कशाला उघडतो
अज्ञानाचे खिंडार
का आहे शुद्धता
तुझ्या अंतरी
मग कशाला घेतो
पाप पदरी
का आहे तुजपाशी
सदैव सत्य
मग का करितो वन वन
लपवण्या असत्य
का आहे तुजपाशी
खरी मित्रता
मग का करितो
इतरांशी शत्रुता
का आहे तुजपाशी
दैवी भक्ती
मग का फसते तुझी
नामी युक्ती
का आहे तुजपाशी
सत्यता हरिश्चंद्राची
भक्ती बाळ श्रावणाचे
मग का करितो इच्छा जगण्याची
का आहे तुजपाशी
सूर्याचा प्रकाश
चंद्राची शीतलता

मग का करितो मी शी मित्रता?

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर।

Related posts