कविता 

अस्तित्व: शोधताना – – –

आपल्या मुला बाळाच्या
नातू पणतुच्या संसारात
प्रकाशाचा भव्य दिप
प्रज्वलित करून,
उरलेले आयुष्य
समाजाला प्रकाश
देण्यासाठी धड़पडणारी
ही आज्जी!असेल नव्वदी
पार केलेली!!पण!पण!!


किती उम्मेद, किती स्वाभिमान!
किती जिदद,
आपल्याच परिवारात
आपले अस्तित्व सिद्ध करते
तेव्हा श्वास रुकतो,
शब्द रुक्ष होतात,
अश्रु अनावर होतात- – – –
पण आपण भानावर येतो
माणूस बनन्यासाठी।

कवि
———————————
देविदास पांचाळ सर
सैनिक स्कूल तुळजापुर
जिल्हा उस्मानाबाद।

Related posts