माझ्या खेडयातील शाळा
भरते ऊंच डोंगरावर
रस्ता आहे नागमोडी
त्याला जागोजागी वळण
नसतील भिंति जरी
विटा ठेवलेल्या छान
पत्र्यावर पावसाळ्यात
हिर्या,मोत्यांची बरसात
माझ्या खेडयातील शाळा
हिरव्यागार शालुवर
खेळाचे मैदान मोठे
लाल माती तयावर
उन्हाळ्यात शाळा
झाडाखाली भरे
ती पहावयास येत असे
चिमण्या- पाखरे
आमचे गुरुजी कड़क
शिस्तिचे बरे,
संस्कार ,शील मूल्य
शिकवत होती खरे -खरे
माझ्या खेडयातील शाळा
अजूनही स्वप्नीं,मनी वसे
साक्षात सरस्वतीचे
मंदिर दिसे !!
कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर जिल्हा उस्मानाबद।