कळंब प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
पोलीस ठाणे, कळंब: हरीदास महादेव ताटे, रा. मस्सा (खं.), ता. कळंब हे दि. 31.12.2020 रोजी 12.00 वा. गावातील ग्रामपंचायत गाळ्यासमोर बसले होते. यावेळी गावकरी- आश्रोबा मोरे यांनी तेथे येउन पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन ताटे यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण जखमी केले.
पतीस होत असलेली मारहाण सोडवण्यास आलेल्या ताटे यांच्या पत्नीसही नमूद आरोपीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या हरीदास ताटे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.