सचिन झाडे
पंढरपूर/प्रतिनिधी
आज 1 जानेवारी 2021 नववर्षानिमित्त विठोबाच्या गाभारा,मंदिरामध्ये आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकुर यांनी सजावट करण्यासाठी एक टन फुले मंदिर समितीस दान दिली आहेत. त्यामध्ये झेंडू ,शेवंती ,जरबेरा अशा विविध रंगीबेरंगी फुलांचा समावेश आहे.