21.9 C
Solapur
February 22, 2024
उस्मानाबाद  कळंब

बंधाऱ्यांच्या कामासाठी ३ कोटी ८९ लाखांचा निधी मंजूर ; आ. कैलास पाटील यांची माहिती.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत जलसंधारण विभागामार्फत मतदारसंघातील कोल्हापुरी बंधारे व पाझर तलाव दुरुस्तीच्या कामांसाठी ३ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. कैलास पाटील यांनी दिली.

आ. कैलास पाटील यांनी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत जलसंधारण विभागामार्फत कोल्हापुरी बंधारे व पाझर तलाव दुरुस्तीसाठी मतदारसंघासाठी तीन कोटी ८९ लाख रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील विविध योजनेच्या दूरुस्तीची कामे मंजुर झाली आहेत.

राज्यातील पुर्ण झालेल्या जलसंधारण योजनापैकी देखभाल व दूरुस्ती आवश्यक असलेल्या योजनाचे परिक्षण व दुरुस्ती करुन सिंचन क्षमता पुर्नस्थापित व्हावी या दृष्टीने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबविण्यात येणार आहे. मराठवाड्यासाठी तीस कोटीचा निधी योजनाच्या दूरुस्तीसाठी मंजूर झालेला आहे. त्यातील धाराशिव (उस्मानाबाद)-कळंब मतदारसंघासाठी तीन कोटी ८९ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये धाराशिव(उस्मानाबाद) तालुक्यासाठी ६८ लाख १९ हजार रुपये तर कळंब तालुक्यासाठी तीन कोटी २० लाख रुपये मंजुर झाले आहेत.

धाराशिव(उस्मानाबाद) तालुक्यातील पाझर तलावाची दूरुस्ती करण्यात येणाऱ्या गावामध्ये आळणी, तावरजखेडा, घाटंग्री, वडगाव सिध्देश्वर यांचा समावेश असणार आहे. कळंब तालुक्यातील पाझर तलावाची दूरुस्ती असलेल्या गावामध्ये गौर, बोरगाव बु, शेळका धानोरा यांचा समावेश असणार आहे. तर कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्याची दूरुस्ती होणार असलेल्या गावामध्ये अंदोरा दोन बंधारे, इटकुर क्रमांक चारचा बंधारा, सापनाई दोन बंधारे, एरंडगाव दूरस्तीसह गेट पुरवठा, सौंदणा दूरुस्तीसह गेट, मोहा दूरुस्तीसह पडदी बांधकाम, नागुलगाव, बोरगाव बु, एकुरका दुरस्तीसह पडदी बांधकाम करण्यात येणार आहे. पाडोळी बंधारा क्रमांक चार, पिंपरी (शि) दूरुस्तीसह पडदी बांधकाम, दहिफळ दूरस्तीसह पडदी बांधकाम, गौर दूरुस्तीसह पडदी बांधकाम, देवधानोरा दूरुस्तीसह पडदी बांधकाम, मंगरुळ दूरुस्तीसह पडदी बांधकाम करंजकल्ला दूरुस्तीसह पडदी बांधकाम, अंदोरा दूरुस्तीसह पडदी बांध बांधकाम, पाथर्डी क्रमांक दोनचा बंधारा, शेळका धानोरा क्रमांक चारचा बंधारा, बहुला दुरस्ती, बाभळगाव दुरुत्ती, उपळाई दूरुस्तीसह गेटपुरवठा करणे, संजितपुर दूरुस्तीसह गेटपुरवठा करणे, शेळका धानोरा दूरुस्तीसह गेट पुरवठा करणे, कोथळा क्रमांक दोनचा बंधारा, खडकी दूरुस्ती, गौर क्रमांक सहा बंधारा पडदी बांधकाम करणे, भाटसांगवी दुरुस्ती आदी गावांतील कामाना मंजुरी मिळाली आहे.

या योजनांच्या कामाची दुरुस्ती झाल्यास सिंचनक्षेत्र वाढेल व पाणीसाठा पुनर्स्थापित होऊन बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळेल असे यावेळी आ. कैलास पाटील यांनी बोलताना सांगितले.

मतदारसंघातील जलस्त्रोत वाढविण्यासाठी जलसंधारण विभागाच्या मार्फत निधीची तरतूद केल्याबद्द्ल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित दादा पवार साहेब, युवासेनाप्रमुख, पर्यावरण मंत्री ना.आदित्यजी ठाकरे साहेब, पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख-पाटील, उपनेते मा.मंत्री प्रा.डॉ.आ. तानाजीराव सावंत, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांचे आभार यावेळी आ. कैलास पाटील यांनी मानले.

Related posts