कळंब, पुढारी वृत्तसेवा – कळंब तालुका पत्रकार संघ हा उपक्रमशील पत्रकार संघ असुन हा पत्रकार संघ जिल्हयातच नव्हे तर राज्यात आदर्श असल्याचे गौरवोद्गार जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी कोरोना योद्धा पुरस्कार वितरण प्रसंगी काढले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ अभिजीत यादव उपस्थित होते. पुढे बोलताना रणदिवे म्हणाले की ग्रामीण भागातील पत्रकारांना सतत बळ देण्याचे व त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम कळंब तालुका पत्रकार संघ करत असतो त्यामुळे हा संघ आपलाच असल्याचे वाटते येवढा मायेचा ओलावा या संघाने पत्रकारांमध्ये निर्माण केला आहे.
यावेळी धनंजय रणदिवे व डॉ अभिजीत यादव यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार विलास मुळीक व सचिन पाटील यांना प्रदान करण्यात आला यावेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, अध्यक्ष परमेश्वर पालकर, संभाजी गिडडे, पार्श्वनाथ बाळापुरे, संजय आडसूळ, सतीश पाटील, जयराम शिंदे, गायक वहाब चौधरी आदी उपस्थित होते.