साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा
उस्मानाबाद – समर्थ मंगल कार्यालय, पवनराजे कॉम्प्लेक्स, धाराशिव(उस्मानाबाद) येथे शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ व पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शन मेळावा शिवसेना नेते, राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. एकनाथ (भाई) शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी ना.एकनाथ भाईंनी संबोधित करताना सांगितले की, नगरविकास विभागामार्फत जिल्ह्यातील प्रलंबित असणारी कामे मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असून वंदनीय हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिकवण कायमस्वरूपी मनात जतन करून ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या ध्येयाने प्रेरित होऊन प्रत्येक शिवसैनिकांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सतत कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यात कळंब-धारशिवचे स्थानिक आमदार मा. कैलासदादा पाटील यांनी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना संबोधित करताना सांगितले की, शिवसेना पक्षात कोणत्याही पदा पेक्ष्या शिवसैनिक हे खूप मोठे पद आहे. वंदनीय हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब नेहमी म्हणायचे की, मी शिवसेनाप्रमुख जरूर आहे ते फक्त शिवसैनिकामुळे, शिवसैनिक हीच खरी माझी ताकत आहे असे नेहमी ठाम पणाने सांगायचे. शिवसेनेत दिलेला शब्द पाळला जातो. जिल्ह्याचा मागासलेपण दूर करण्यासाठी अधिकाधिक विकासाभिमुख कामे करण्यासाठी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सदैव तत्पर असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री सन्माननीय ना.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना, अतिवृष्टीसारख्या संकटाच्या काळातही राज्यातील जनतेच्या हितांचे अनेक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली. कोवीडच्या काळात जनतेच्या आरोग्याचे रक्षण केले. एक कुटुंबप्रमुख म्हणून जशी शिवसैनिकांची काळजी घेतात अगदी तशीच महाराष्ट्रातील जनतेची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब घेत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेली जनहिताची कामे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी जनतेत मिसळून जनतेची कामे करावीत असे आवाहन यावेळी आ. कैलासदादा पाटील यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना व शिवसैनिकांना केले.
या मेळाव्यास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.ज्ञानराजजी चौगुले, मा.आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील, जिल्हाप्रमुख गौतम लटके सर, जी.प. उपाध्यक्ष धनंजय सावंत, नगराध्यक्ष मकरंद नंदूभैय्या राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, युवासेना विस्तारक नितीन लांडगे, युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अक्षय ढोबळे तसेच शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत आघाडीचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.