27.5 C
Solapur
September 27, 2023
उस्मानाबाद  कळंब

ठाकरे सरकारच्या माध्यमातून धाराशिव (उस्मानाबाद) व कळंब महापालिकांना वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर ; आ. कैलास पाटील यांची माहिती.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

धाराशिव (उस्मानाबाद) ता. 13 ः ठाकरे सरकारच्या माध्यमातुन उस्मानाबाद व कळंब मतदारसंघातील दोन्ही नगरपालिकांना वैशिष्टपुर्ण योजनेअंतर्गत निधी मंजुर करण्यात आला असल्याची माहिती कळंब-धाराशिव (उस्मानाबाद) विधानसभेचे विद्यमान आमदार मा. श्री. कैलास पाटील यांनी दिली.

उस्मानाबाद नगरपालिकेसाठी पाच कोटी तर कळंब नगरपालिकेच्या विकासकामासाठी दोन कोटी असा एकुण सात कोटीचा निधी मंजुर होऊन सबंधित कामाना प्रशासकीय मान्यता देखील मिळाल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे.

यामध्ये सर्वाधिक निधी उस्मानाबाद शहरातील बार्शी नाका येथील जिजाऊ चौकापापासुन बोंबले हनुमान चौकापर्यंत रस्त्याच्या कामासाठी देण्यात आला आहे. हा रस्ता व्हावा अशी गेल्या अनेक वर्षापासुनची या परिसरातील जनतेची तसेच शहरवासीयांची मागणी होती. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणही वाढलेले होते, रोड पुर्ण उकरुन गेल्याने खड्डे दिसत होते. साहजिकत दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना वाहने चालविणे देखील कठिण बनले होते. वृत्तपत्राच्या माध्यमातुन तसेच वेगवेगळ्या संघटनानी केलेल्या आंदोलनामुळे या रस्त्याची प्रश्नाची गांभीर्य़ाने दखल घेऊन तत्काळ या रस्त्याचे काम होण्यासाठी आमदार पाटील यांनी प्रयत्न केले. त्या भागातील नागरीकांनीही आमदार कैलास पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर या रस्त्याची मागणी लावुन धरली होती. आमदार पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले असुन यासाठी साडेतीन कोटीच्या निधीची तरतुद करण्यात आली आहे. शिवाय शहरातील समर्थ नगर भागामध्येही एक कोटी 32 लाखाचा निधी दिला असुन तिथे रस्ता व नाली बांधकाम केले जाणार आहे. विकास नगर व महात्मा गांधी नगर येथील रस्ते तसेच नालीसाठी जवळपास पन्नास लाखाची तरतुद करण्यात आली आहे. ट्रीमिक्स पध्दतीने ही कामे करण्यात येणार आहेत.

कळंब शहरातील ढोकी मार्ग ते ओम बाल रुग्णालय ते बाबा नगर सिमेंट रोड काँक्रीट नाली तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी एक कोटीचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या शिवाय दत्त नगर मधील सिमेंट रोड व नाली तयार करणे या कामासाठीही एक कोटी असा कळंब नगरपालिकेसाठी दोन कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे.

मतदारसंघातील दोन्ही नगरपालिकेच्या विकास कामांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यानी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल दोन्ही शहरवासीयांच्यावतीने कैलास पाटील यानी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related posts