33.9 C
Solapur
February 21, 2024
तुळजापूर

किलज ग्रामपंचायत सदस्यपदी ज्योती राठोड यांची बिनविरोध निवड.

साईनाथ जगन्नाथ गवळी
विभागीय संपादक – मराठवाडा विभाग.

तुळजापूर तालुक्यातील किलज येथील ग्रामपंचायत निवडणूकीत प्रभाग क्रमांक ४ मधील उमेदवार ज्योती संतोष राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गावचा विकास करण्यासाठी सक्षम उमेदवार म्हणून ज्योती राठोड यांची गावकऱ्यांनी सर्वानुमते निवड केली आहे. जनतेने दाखवलेला विश्वास टिकवण्यासाठी पुढील ५ वर्ष आपण गावासाठी कार्य करण्याचे ठरवले आहे असे या वेळी सौ. ज्योती राठोड यांनी सांगितले. त्याच बरोबर गावातील वीज, पाणी, रस्ते, आदी प्राथमिक सुविधा जनतेला मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असेन असे ज्योती राठोड यांनी सांगितले आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. झालेल्या नियुक्ती बद्दल सौ. ज्योती राठोड यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित बंजारा समाजाचे डी. आर.राठोड, गुलाब चव्हाण, शाम पवार, दिलीप पवार, सह आदी बंजारा समाजातील मान्यवर उपस्थित होते.

गावकऱ्यांनी ठेवलेला विश्वास हा योग्य कामासाठीच लावीन. गावातील सर्व प्रकारच्या समस्या उदा. आरोग्य सेवा, रस्ते, पाणी, वीज या अडचणी निर्माण होणार नाहीत यासाठी कायम कार्यरत असेन. जनतेने दाखवलेल्या या विश्वासाबद्दल तमाम जनतेचे मनापासून आभार. हा दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन.
-सौ. ज्योती संतोष राठोड.
नूतन ग्रा. पं सदस्य, किलज.

Related posts