तुळजापूर

दिलपाक प्रतिष्ठाण संचलित नालंदा बुद्ध विहार कुंभारी येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन

प्रतिक भोसले,
सलगरा (दि.) प्रतिनिधी –

दि. २० डिसेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे दिलपाक प्रतिष्ठान संचलित नालंदा बुद्ध विहार येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीस तथागत गौतम बुद्ध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना प्रमुख पाहुणे पोलीस पाटील, विठ्ठल वडणे व बाबुराव दिलपाक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक त्रिशरण व पंचशील गाथा घेण्यात आली यादरम्यान लहान मुलांची भाषणे झाली त्यात प्रामुख्याने स्वप्नील तात्यासाहेब पारधे व हर्ष प्रभाकर दिलपाक यांनी गाडगेबाबांच्या थोर विचार मांडून त्यांना अभिवादन केले, त्यानंतर जेष्ठ नागरिक बाबुराव दिलपाक यांनी गाडगेबाबांच्या स्वच्छता अभियानाविषयी माहिती देताना आपण सर्वानी आचरण करणे किती गरजेचे आहे हे सांगितले, यावेळी प्रमुख पाहुणे विठ्ठल वडणे यांनी गाडगे बाबांच्या अंधश्रद्धा निर्मूलन , शिक्षण क्षेत्रातील कार्य , स्वच्छते बाबतचे कार्य , कीर्तनातून प्रबोधन अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमा दरम्यान अशोककुमार नामदेव दिलपाक यांनी दिलेली थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची पुस्तके पोलीस पाटील विठ्ठल वडणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संकेत गोपाळ दिलपाक यांनी केले .

यावेळी ज्ञानेश्वर दिलपाक ,बालाजी दिलपाक , बाबा दिलपाक ,संतोष दिलपाक , तात्यासाहेब पारधे , मनोज दिलपाक , गौतम दिलपाक , अमोल दिलपाक , शैलेश दिलपाक, यश दिलपाक तर उपस्थित महिलांमध्ये सारिका प्रभाकर दिलपाक , सुधामती दिलपाक , रेणुका दिलपाक , रेश्मा दिलपाक , काजल दिलपाक , वैभवी दिलपाक , इ .बौद्ध उपासक व उपासिका तसेच गावकरी उपस्थित होते

Related posts