जिल्हा प्रतिनिधी :सलमान मुल्ला
सामाजिक कार्यकर्ते अकिब पटेल यांची टिपू सुलतान ब्रिगेड संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
नुकतंच त्यांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जहिरोद्दीन पठाण यांनी निवडीचे पत्र दिले आहे. अकिब पटेल हे मागील काही वर्षांपासून कळंब शहरातील विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
यापूर्वी त्यांनी शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती, टिपू सुलतान जयंती, मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवले आहेत. सुरवातीला कोरोनासारख्या महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे ज्यांचे हातावरचे पोट आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
आशा 200 पेक्षा जास्त गरजू लोकांना त्यांनी आगाज फाउंडेशनच्या माध्यमाने रेशन किटचे वाटप केले होते. तसेच शहरातील अनेक सामाजिक कार्यात त्यांचा अग्रगण्य सहभाग असतो.
याच कार्याची दखल घेऊन त्यांची टिपू सुलतान ब्रिगेड संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. देशसेवेसाठी आणि मानव सेवेसाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन दिलेल्या नियुक्तीपत्रात करण्यात आले आहे.
या निवडीनंतर पटेल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.