कविता 

मी नवतरुणी ; (जागतिक महिला दिन विशेष)

नव्या युगाची मी नवतरूणी
गरूडभरारी घेईन गगनी…

झेप अंतराळात घेऊनी
सातसागर उल्लंघूनी …

नव उमेद अंगी बाणूनी
ऊर्जेची निर्मिती करुनी…

आत्मविश्वासाची करणी
बळ देई मज ही धरणी

सीतेस उदरी सामावूनी
मजअवकाश मोकळे करूनी.

वाताचे मजबूत बाहू
तेजासम शक्ती दावू

करीन अन्यायावर वार
मी न सेाशिन अत्याचार..

————————————————————————————-

कवयित्री:-
सौ. ज्ञानेश्वरी शिंदे-नरवडे
सहशिक्षिका – जि.प.प्रा. शाळा, तामलवाडी.

Related posts