नको ती स्पर्धा
नको ते बंधन
माझ्या शब्दातून
निघू दया स्पंदन
नको स्पर्धेचे नियम
ना अटी तटी ना
विषयचे कुंपन
मुक्त रहुदयातून
शब्द कळयाना
फुलू दया,उमलु दया
सुगंध बहरु दया
शब्दाचे पंख फुलपाखरासारखे
बागड़ू दया।
शब्दाना गुलाम बनवू नका
जुलमी इंग्रजा सारखे
साखळ दंडाने बांधू नका।
माज़ी कविता मला मुक्त लिहू दया।
स्पर्धेच्या त्या बंधनाने
बांधून शब्दाचे पंख छाटू
नका। स्पर्धेने शब्द थिटे
पडतात ,तोकड़े पडतात
नको ती स्पर्धा- – – – –
कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.