जगणं कस असावं
दुसर्याला सकारात्मक
ऊर्जा देणार असावं
जगणं आनंदी, उत्साही
बळ देणार असावं
माणसाचे जगणं
पशुसारख नसावं।
जगणं एकमेकाच्या
कमी येणार असावं
दुसर्याच्या सुख दुखात
सहभागी होणार असावं
जगणं चंद्र व चांदन्यासारख
असावं सर्वाना प्रकाश देत
जगावं
जगणं नदिसारख स्वछ,निर्मळ,
सुंदर,शांत असावं
जगणं कर्तव्याला जाणून
संस्कृतिला धरून
आपल्या परिवारसाठी सुखी,
आनंदी, कल्याणकारी असावं
आपल जगणं दुसर्यासाठी
जगणं असावं।
कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव (सर)
श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापुर., जिल्हा उस्मानाबाद.