hacklink hack forum hacklink film izle hacklink chicken roadrocket playrocket playlunchtime resultsDENEME BONUSUjojobetholiganbetjojobetsüperbetinsüperbetin girişsüperbetinsüperbetin girişsüperbetinsüperbetin girişbetcio
उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प – खा.ओमराजे निंबाळकर.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला असून या अर्थसंकल्पाबाबत अनेक नेत्यांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या अर्थसंकल्पाबाबत धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभेचे खासदार मा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी “जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अर्थसंकल्प” अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा विषयाला आज अर्थसंकल्पामध्ये गती मिळाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतुद करण्यात आली असुन पुढील वर्षी प्रवेश प्रक्रिया होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. त्यामुळे यंदाचा हा अर्थसंकल्प जिल्ह्यासाठी ऐतिहासिकच ठरला आहे. महाविकास आघाडी सरकारने अत्यंत कठिण काळातही बिघडलेली आर्थिक घडी बसवुन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महिला, विद्यार्थीनी, युवक, खेळाडु, शेतकरी, मजुर, घरकाम करणाऱ्या महिला, उद्योजक, नोकरदार आदी सर्वच घटकांच्या हिताचा विचार अर्थसंकल्पामध्ये केला आहे.

तीन लाखापर्यंत कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता शून्य टक्के दराने कर्ज देण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात नवीन भाजीपाला रोपवाटिका स्थापन होणार असल्याने विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातुन बाजार साखळी निर्माण करण्यात येणार आहे. नाबार्डच्या सहाय्याने राज्यात नवीन गोदामं उभारणार असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल टिकुन राहण्यासाठी मदत होणार आहे.

अशा प्रकारे शासनाच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पावर स्तुतीसुमने उधळत महाविकासआघाडी सरकारचे आभार यावेळी खा. ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

Related posts