साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर / उस्मानाबाद (धाराशिव)
प्रतिनिधी.
आज रोजी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. सतीश चव्हाण यांनी उस्मानाबाद येथे पदाधिकारी यांना भेट दिली. यावेळी मा. संजय निंबाळकर यांच्या कार्यालयात मा. सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, उस्मानाबाद च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. संजय निंबाळकर यांनी मा. सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना जिल्ह्यातील सर्व बुथनिहाय माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, सतिशजी हे निवडून आलेलेच आहेत. पण त्यांचा निकाल हा जास्तीत जास्त लवकर आणि जास्त फरकाने कसा लागेल याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी, हितचिंतक बांधवांनी जागरूक राहून जास्तीतजास्त मत जमा करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आपण नवनवीन तंत्रज्ञानाचा ही योग्य वापर करून मतदाराला मतदान करताना कसल्याही प्रकारच्या अडचणी न येऊ देता त्याला योग्य प्रकारे त्याची माहिती मिळेल याची काळजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घेण्यात येईल अशी माहीती यावेळी त्यांनी दिली. तसेच मा. सतिशजी चव्हाण यांचा विजय निश्चित आहे असे ठणकावून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. संजय निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मा. सतीश चव्हाण यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की, “माझे कार्य तर सर्वाना माहीतच आहे. याप्रमाणे किंवा यापेक्षाही अधिक उत्कृष्ट प्रकारे अखंड आपल्या सेवेसाठी मी तत्पर राहीन. तरी सर्व कार्यकर्ते बांधवांनी सतर्क राहून महाविकास आघाडीच्या विजयात आपले मोलाचे योगदान देऊन सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
या प्रचार दौऱ्यात मा. सतीश चव्हाण यांनी जि.प. उस्मानाबाद, जनता बँक तसेच अनेक महाविद्यालयांना भेटी दिल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपस्थित महाविकास आघाडीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार मा. सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या अनेक पदाधिकारी बांधवांनी आपापली मते मांडत सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. संजय निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष तथा जि.प. सदस्या सक्षणा सलगर, प्राचार्य जयसिंगराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेख, मा. पं.स. सदस्य, रामभाऊ पडवळ, संजय पाटील-दुधगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष लक्ष्मण माने, नानासाहेब जमदाडे, महेश पडवळ, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.