साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.
कळंब, जि. धाराशिव (उस्मानाबाद) – दहिफळ ता.कळंब येथिल भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस ला खिंडार पडले असून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख नेते यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना उद्धवजी ठाकरे साहेब व युवासेना प्रमुख तथा राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतूत्वावर विश्वास ठेवून, शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.आ.तानाजीराव सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.शंकरराव गडाख-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिफळ ता.कळंब येथिल भाजपा नेते विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री.मधुकर भुसारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गंगाधर ढवळे, समाधान मते, बाळासाहेब मते, रामेश्वर भातलवंडे, सदाशिव मते, शहाजी ढवळे, शिवशंकर मते, रामेश्वर सपाटे, अनिल मते, राष्ट्रवादी चे युवानेते शहाजी शिवाजी मते, चिंतामणी कोठावळे, सुधीर मते, विलास काळे, धनंजय ढवळे, भास्कर वाघमारे, सोसायटीचे माजी सदस्य शिवाजी काळे, वैजिनाथ मते, श्रीराम मते, सुदर्शन काळे, सुरेश भातलवंडे, किरण मते, सुर्यकांत आडसुळ, गणेश भातलवंडे, संदिप मते, बालाजी भातलवंडे, रोहित खुणे, दत्ता नारायण, सदाशिव मते, गणेश मते, अजित कपाट, सुशिल मते आदी सह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश घेऊन धाराशिवचे लोकप्रिय खा. ओमराजे निंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटील यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी उपस्थित आमदार व खासदार यांनी नवनिर्वाचित सरपंच चरनेश्वर पाटील, उपसरपंच सुब्राव मते, ग्रा.पं.सदस्य संतोष मते, बालाजी गोरे, सुनिल सुतार आदींचा सत्कार करून पुढिल सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी खा. ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळक, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे, कळंब शिवसेना शहरप्रमुख प्रदिप बप्पा मते, उपतालुकप्रमुख भारत नाना सांगळे, माजी पं.स.सभापती महादेव कांबळे, माजी उपसरपंच बालाजी मते, पं.स.सदस्य प्रशांत धोंगडे, सरपंच आसाराम वाघमारे (बाभळगाव) माजी उपसरपंच बाबासाहेब मडके (मोहा) सरपंच राजू झोरी (मोहा) उपसरपंच सोमनाथ मडके (मोहा) उपसरपंच सचिन काळे (डिकसळ), अश्रूबा रणदिवे, पांडुरंग महाजन, बंडू यादव शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.